नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 02 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. नव्याने पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले जात आहे. पण, जळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करताना पैसे उडवल्याचा प्रकार घडला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन सभा जळगावात पार पडली. याच सभेच्या दिवशी धरणगावामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने जंगी कार्यक्रम पार पडला. कार्यकर्त्यांकडून गुलाबराव वाघांवर पैसे उडवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (ठाकरे-सत्तार संघर्ष वाढणार, आदित्य ठाकरेंची तोफ सत्तारांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार!) एकीकडे शिवसेना नेत्यांकडून पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्यात येत असताना पदाधिकाऱ्यांकडून मात्र उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. ( बेळगाव सीमाप्रश्न पंतप्रधान मोदी सोडवणार? महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये मोठी घडामोड ) दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव येथे घेतलेल्या प्रबोधन सभेत गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला असून यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच सुषमा अंधारे यांनी " नथनी या कही बार साद बदल देते है, पुण्य की आड मे पाप बदल देते है, मतलब के लिए कोई लोग अपने बाप बदल लेते है" असं म्हणत गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, धरणगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रबोधन सभा संपन्न झाली या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी देखील उपस्थिती लावली. या कार्यक्रमातून थेट गुलाबराव देवकरांनी गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात एक ठोस काम दाखवावे व लाख रुपये मिळवावे असे आवाहन केले आहे.