JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दार उघड उद्धवा दार उघड, भाजपच्या आध्यात्मिक सेलचा उद्धव ठाकरेंना इशारा

दार उघड उद्धवा दार उघड, भाजपच्या आध्यात्मिक सेलचा उद्धव ठाकरेंना इशारा

साई मंदिर लवकर खुलं न झाल्यास उपोषण किंवा आंदोलनाचा पावित्रा

जाहिरात

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन आणि प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्याला अपेक्षित यश येत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 26 ऑगस्ट: देशभरातील अनेक मंदिरे सुरू झाली असताना शिर्डीचे साईमंदिर बंद का? असा सवाल शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. साई मंदिर लवकर खुलं न झाल्यास उपोषण किंवा आंदोलनाचा पावित्रा शिर्डी ग्रामस्थ तसेच साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि व्यावसायिकांनी घेतला आहे. दुसरीकडे भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून 29 ऑगस्टला राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे. हेही वाचा.. सुशांत केस ड्रग्स प्रकरण: भाजप आमदारानं उद्धव ठाकरे सरकारला केला खोचक सवाल गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिर बंद आहेत. शिर्डीचे साईबाबा मंदिर बंद असल्याने संपूर्ण अर्थकारण पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांचे रोजगार देखील हिरावले आहे तर संस्थान देखील आर्थिक कोंडीत सापडल्याने कर्मचा-यांचे पगार कपात करत आहे. सरकारने आमच्या‌ मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा कोर्टात जाण्याबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, साई संस्थानचे माजी विश्वस्त कैलास कोते यांचेसह ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली. दुसरीकडे, भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून राज्यभरातील मंदिर प्रमुखांची काल मंगळवारी बैठक पार पडली आहे. केंद्र सरकारने काही अटी शर्थीवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना राज्यसरकार मात्र परवानगी देत नसल्याच्या विरोधात जन आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्ट रोजी राज्यसरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष गणेश आचार्य यांनी दिला आहे. हेही वाचा… अनलॉकमध्ये अनेक उद्योग व्यवसायांना परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे आता मंदिरे बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी राज्यातील मंदिरे सुरू करायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या