JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पितृपक्षानंतरच?

शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पितृपक्षानंतरच?

त्याचबरोबर याच महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही पूर्ण होणार आहे

जाहिरात

शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तसंच पालकमंत्र्यांची घोषणाही त्यामुळे रखडली आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 सप्टेंबर : शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार मोठ्या प्रतिक्षेनंतर पार पडला. आता दुसरा शपथविधी कधी होणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सवामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार  (cabinet expansion) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे, 26 सप्टेंबर विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी इच्छुकांना सांगितले. शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी वर्षा निवासस्थानी बोलावले होते. यावेळी अनेक कलाकार, उद्योजक सुद्धा हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्या आमदारांच्या गटाची वेगळी बैठक घेतली, भोजन सुरू होण्याआधी अशा दोन टप्प्यांमध्ये बैठक घेण्यात आल्या होत्य, असे वृत्त दैनिक दिव्य मराठी ने दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व इच्छुक मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या मतदारसंघातील माहिती जाणून घेतली. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली असून आता लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. विस्ताराची तयारीही पूर्ण झाली आहे. आता कोणतेही अडथळे राहिले नाही, एक-दोन मुद्यांवर चर्चा सुरू आहे, त्यावरही तोडगा निघणार आह, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. (युतीमध्ये भाजपचं ‘कल्याण’, मग श्रीकांत शिंदेंना काय? मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया) 10 सप्टेंबरला दुपारपासून पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. पितृपक्ष संपल्यावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर किंवा 27 सप्टेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. त्याचबरोबर याच महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही पूर्ण होणार आहे. त्या यादीतील नाव सुद्धा जाहीर केली जाणार आहे, अशी माहितीही शिंदेंनी दिली. ( अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी साताऱ्यात सापडली ) पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नाव चर्चेत आहे. पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याचं नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात 19 जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या