Robbery CCTV: शहापुरात दरोडेखोरांचा हैदोस; घरात घुसून दागिन्यांची लूट, घटनेचा सीसीटीव्ही आला समोर
शहापूर, 5 मे : ठाणे जिल्ह्यातील शहापुरात (Shahapur) दरोडेखोरांचा हैदोस सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. शहापूर तालुक्यातील वाशिंद (Vashind) येथे दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत दरोडा (robbery) टाकला आहे. वाशिंदमधील शिवाजीनगर भागातील रहिवासी विनोद दांडकर यांच्या घरी चाकूचा धाक दाखवून जबरी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर श्रीसमर्थ कृपा आयुर्वेद व डायग्नोस्टीक सेंटरही चोरट्यांनी फोडले आहे या दोन्ही घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिंदमध्ये रात्री 2.30 च्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी विनोद दांडकर यांच्या घरात घुसून चाकू सुऱ्याचा धाक दाखवून घरातील कपाटे फोडली. त्यातील सहा ते सात तोळ्याचे सोन्याचे दागिने सोबत चांदीचे दागिने आणि 30 हजारांची रोख रक्कम घेऊन लुटून नेले.
तर थोड्याच अंतरावर असलेले तुषार पाटील यांचे आयुर्वेद व डायग्नोस्टीक सेंटर फोडून दोन सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीडीआर, व रोख रक्कम घेऊन पळून नेले आहे. यावेळी चोरटे पळून जात असताना शेजारच्या रहिवाशांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व थरार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वाचा : प्रेम प्रकरणातून हत्याकांड, हत्येचा खळबळजनक VIDEO आला समोर याबाबत वाशिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. वाशिंद गावात वारंवार चोरी दरोड्याच्या घटना होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भिवंडीत सशस्त्र दरोडा ; कुटुंबावर हल्ला करत लाखोंचे दागिने लांबवले मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सशस्त्र दरोडा पडला आहे. भिवंडी शहराला लागून असलेल्या खोणी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. घरातील एका खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडून पोबारा केला आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी गावात ऍड अजय पाटील यांच्या घरात हा दरोडा पडला होता. अजय पाटील यांचे कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. अँड अजय विष्णू पाटील हे आपल्या पत्नी मुला सह एका खोलीत तर त्यांची आई नंदा आणि सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले होते. दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला. परंतु तेथे काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील घरात वळवला. तेथे सुद्धा दरवाजाच्या आतील कडी उचकटून आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले आणि त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली.