JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यभरात आजपासून शाळा सुरु, विदर्भात मात्र 27 जूनला भरणार वर्ग

शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यभरात आजपासून शाळा सुरु, विदर्भात मात्र 27 जूनला भरणार वर्ग

Maharashtra School: राज्यभरात आजपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जून: राज्यभरात आजपासून म्हणजेच 13 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये उन्हाळी परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. त्यात आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरु (Maharashtra school reopen) होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार आजपासून राज्यातल्या शाळा सुरु होत आहेत. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढलं आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू झाल्या आहेत. काय म्हटलं आहे आदेशात शाळा जरी 13 जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात नमूद करण्यात आलं. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात सांगण्यात आलं आहे. Mental Health: तुम्ही मानसिक आजारी तर नाही ना? अनेकांमध्ये अशी 5 लक्षणं जाणवू लागली आहेत आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश दिले आहेत. राज्यातल्या शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी निर्देश जारी केले. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू झाल्या. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे नियम पाळणं आवश्यक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या