JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अफजलखानच्या कबरीजवळचा परिसर 3 दशकांमध्ये कसा बदलला? पाहा Video

अफजलखानच्या कबरीजवळचा परिसर 3 दशकांमध्ये कसा बदलला? पाहा Video

या ठिकाणी अवघ्या सहा फुटांच्या कबरीवर सुरूवातीला फक्त कौलारू छप्पर होते. त्यानंतर सुरूवातीला ऊरूस भरवून अफजल खानाच्या उदात्तीकरणाला सुरुवात झाली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 11 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पश्चिमेला असलेला प्रतापगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आहे. याच किल्ल्याची पायथ्याशी महाराजांनी स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं आक्रमण परतावलं.  स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाहाचा सर्वात बलाढ्य सरदार अफजलखानाचा महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी कोथळा बाहेर काढला. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस संपूर्ण जगभर शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा शिवप्रताप दिन (10 नोव्हेंबर 2022) गेल्या काही वर्षांपासून वेगळा ठरला. कधी झाली उदात्तीकरणाला सुरूवात? प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानच्या कबरीजवळचे अतिक्रमण यंदा शिवप्रतापदिनी पाडण्यात आले. गेल्या 3 दशकांपासून वाढलेल्या अतिक्रमणामुळे हा परिसर वादग्रस्त बनला होता. या ठिकाणी अवघ्या सहा फुटांच्या कबरीवर सुरूवातीला फक्त कौलारू छप्पर होते. 1980 ते 85 दरम्यान या परिसरात अतिक्रमण सुरू झालं. सुरवातीला उरुस भरवून अफजल खानाचं उदात्तीकरण करण्यात आलं. या भागात बांधण्यात आलेल्या दर्ग्याचं दर्शन घ्याची सक्ती काही फकीर करतात, अशी तक्रार काही जण करू लागले.हे अतिक्रमण काढावं या मागणीसाठी 2006 मध्ये तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळीपासून अफजल खान कबरीकडं प्रवेश बंदी करण्यात आला होता. Satara: अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं; परिसरात जमावबंदीसह मोठा पोलीस बंदोबस्त सुप्रीम कोर्टाचा होता आदेश सन 2006 ला काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून हे उदात्तीकरण थांबवावं, अशी मागणी केली होती. यावरती सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं ही कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. या परिसरात गेल्या काही वर्षांपासून जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे. अफजलखानच्या कबरीजवळ नेहमी चोख बंदोबस्त देखील ठेवला जातो.  2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे अतिक्रमण काढण्यात यावं, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही अतिक्रमण पाडण्यात आलं नव्हतं.  अखेर गुरुवारी शिवप्रतापदिनी अत्यंत गोपनीयता पाळत ही अतिक्रमणं काढण्यात आली. सातारी दणका! शेतकऱ्यानं चक्क ग्रामपंचायतीत घुसवला रेडा, video viral अफजल खानच्या  कबरीच्या बाजूला एक मोठी खोली, त्याच्यावजळच 9 ते 10 खोल्यांची धर्मशाळा आहेत. त्या कबरीच्या ओट्याच्या बाजूला करण्यात आलेलं बांधकाम काढण्यात आले आहे.  वन आणि महसूल विभागाच्या जागेवर हे अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांची राहण्यासाठी खोली होती ती देखील काढण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक वर्षापासून कोर्टामध्ये याचिका तसेच तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाला तसे निर्देश करण्यात आले होते. महसूल, बांधकाम, वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांनी सर्वांनी एकत्र ही कारवाई केली, अशी माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या