मुंबई, 21 डिसेंबर : डिसेंबर महिना संपत असतानाच राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईसह राज्यभर तापमान कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातल्या बहुतेक भागात गारवा जाणवत आहे. मुंबईचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवलेले किमान तापमान 20.5 अंश सेल्सिअस होते, तर कुलाबा वेधशाळेत 23.2 अंश सेल्सिअस होते. ख्रिसमस वीकेंडमध्ये तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र पुणे शहरात बुधवारी 11.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सांगलीमध्ये 15. 3, साताऱ्यात 14.2 तर कोल्हापूरला 17 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्र नाशिक शहरात बुधवारी किमान तापमान 13 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर मालेगावमध्ये 16, आणि निफाडमध्ये 10.2 अंश सेल्सियस तापमान होते. अहमदनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश तर किमान 16 अंश सेल्सियस असेल, असा अंदाज आहे. तर, जळगावमध्ये 13.5 आणि धुळ्यात 10 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात गारठा वाढला, नाताळला थंडीचा जोर आणखी वाढणार विदर्भ विदर्भातील यवतमाळमध्ये सर्वात कमी 11.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये 12.9 तर वर्ध्यात 14.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या शहरात 15 पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.
मराठवाडा औरंगाबादमध्ये बुधवारी 10.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. जालनामध्ये 13.5 अंश तर बीडमध्ये कमाल 31 तर किमान 17 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे.