मुंबई, 16 डिसेंबर : डिसेंबर महिना सुरू झाल्यानं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मेंडोस चक्रीवादळाचं सावट कमी झालं असलं तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. राजधानी मुंबईत मात्र उष्ण आणि दमट हवामान असून येथील पारा 30 अंश सेल्सियसपेक्षाही जास्त आहे. मुंबईत उकाडा डिसेंबर महिन्यातही मुंबईकरांची उकाड्यातून सुटका नाही. मुंबईतील बहुतेक भागामध्ये 32 ते 34 अंश सेल्सियस तापमान असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र पुणे शहराचे दिवसाचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सांगलीमध्ये मागील 24 तासांमध्ये कमाल 32.3 तर किमान 18.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 30.5 तर किमान तापमान 19 अंश इतके होते. सोलापूरमध्ये दिवसभर प्रखर उन राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. सोलापूरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर 19.5 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झालीय. मेंडोस वादळ शमले पण, राज्यात अद्यापही पावसाचे सावट, मुंबईत अशी असेल स्थिती उत्तर आणि मध्य महाराष्ट्र नाशिक शहरात सकाळपासूनच दमट वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, सिन्नर, - नाशिक शहरासह विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिकमध्ये कमाल तापमान 28.8 तर किमान 17.9 अंश तापमानाची नोंद झालीय. तर अहमदनगरमध्ये मागील 24 तासांमध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान 21 अंश सेल्सियस इतके होते. विदर्भ नागपूरमधील किमान तापमानात सुमारे 1 अंश सेल्सियसची घट होऊन ते 18.9 अशं सेल्सियस इतके होते. तर शहरातील कमाल तापमान हे 30.8 असं सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. वर्ध्यात कमाल 31.2 तर किमान 19.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावतीमध्ये कमाल 32.2 तर किमान 19.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनो, सरकारी वखारात करा धान्यसाठा, कर्जासह मिळेल मलाचेही संरक्षण! मराठवाडा मराठवाड्यातील औरंगाबाद येथे 40 मि.मी, गंगापूर येथे 30 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कमाल तापमान 29.4 तर किमान 16 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर बीड शहरात कमाल तापमान 30 तर किमान 20.1 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.