JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काय सांगता, सरपंचपदासाठी थेट परदेशातील शिक्षण अर्ध्यावर सोडून 21 वर्षांची तरुणी गावी

काय सांगता, सरपंचपदासाठी थेट परदेशातील शिक्षण अर्ध्यावर सोडून 21 वर्षांची तरुणी गावी

यशोधरा राजे शिंदे हिचे अमेरिकेतील जॉर्जिया याठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 14 डिसेंबर : सध्या राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचा माहोल आहे. ग्रामपंचायत निवडणुक म्हटली की गावातली जुनी जाणती मंडळी त्यात सहभागी होतात. या नंतर आता तर काही ठिकाणी तरुणाईचा सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सहभाग दिसून येतो. मात्र, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कोणी परदेशातील शिक्षण सोडलं, हे तुम्ही ऐकलंय का? तर हो हे खरंय. 21 वर्षाची तरुणी अमेरिका सोडून गावी -  गावच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षण सोडून एक तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखड्यात उतरली आहे. यशोधरा राजे शिंदे, असे या अवघ्या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी येथे सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सध्या ती आपले नशीब आजमावत आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी सरपंच पदाचे निवडणूक लढवणाऱ्या यशोधरा राजे शिंदे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 21 वय असणारी यशोधरा ही एक उच्चशिक्षित तरुणी असून गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी थेट परदेशातून आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून परतली आहे. यशोधरा राजे शिंदे हिचे अमेरिकेतील जॉर्जिया याठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे. मात्र, यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सरपंच पदासाठी यशोधरा राजे हिने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे. हेही वाचा -  मालेगावातील शेतकऱ्याच्या पोरीची कमाल, MPSC मध्ये उत्तीर्ण होऊन बापाचं स्वप्न केलं साकार यशोधरा हिला राजकीय वारसा असून यशोधरा राजे हिचे पणजोबा गजाननराव बाळासाहेब शिंदे सरकार आणि आजी मंदाकिनी बाळासाहेब शिंदे सरकार यांनी नरवाड गावचे सरपंच म्हणून कारभार पहिला आहे. आपल्या आजी आजोबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून यशोधरादेखील थेट सरपंच पदाच्या निवडणुक रिंगणात उतरली आहे. गाव खेड्यातील आजची तरुण पिढी नोकरी शिक्षण व्यवसायाच्या निमित्ताने पुढे शहरात आणि परदेशात जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, असे असताना विदेशातील उच्च शिक्षण सोडून गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन परतलेली यशोधरा राजे ही नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी आदर्श ठरत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या