मुंबई, 6 नोव्हेंबर : ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाहीत, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास चालणार नाही. मराठा लाईट इनफन्ट्री च घोषवाक्य हर हर महादेव आहे. त्याचा अपमान नको. तसेच वेडात मराठे वीर दौडले सातचा फोटो बघा. गाठ संभाजी छत्रपतींशी आहे, हे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले.
एकाही मावळाच्या डोक्यावर पगडी नाही हा मोठा अपमान आहे. त्यामुळे सगळ्या प्रोड्युसरला इशारा आहे. हर हर महादेववर कायदेशीर दावा करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच माझे सहकार्य असल्याचे सिनेमांत लिहीले आहे. मात्र, चुक आपली आहे. आपण वाचत नाही. खरा इतिहास वाचायला हवा. कोण आडवं आलं तर पुढचं पुढे बघा, असा इशाराही त्यांनी दिला.
नुकताच हर हर महादेव हा मराठीतील पहिला बहुभाषिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वेडात मराठी वीर दौडले सात या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 2023च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मराठीतील दुसरा बहुभाषिक सिनेमा असून मराठीसह हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. हेही वाचा - Video : शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारच का? पाहा Inside Story वेडात मराठी वीर दौडले सात या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सात वाघांची गोष्ट दाखवण्यात येणार आहेत. टेलिव्हिजन आणि मराठी सिनेसृष्टीतील सात तगडे कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस फेम अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, हार्दीक जोशी, सत्या मांजरेकर, विराट मडके आणि प्रवीण तरडे हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. जिवाजी महाल, तुळजा, मल्हारी, सूर्याजी, चंद्राजी यासह शिवरायांच्या सात मावळ्यांची यशोगाथा सिनेमा पाहायला मिळणार आहे.