JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Buldhana Sanjay Gaikwad : चून चून के, गिन गीन के मारे जायेंगे.. राड्यानंतर बंडखोर आमदार गायकवाड यांची पुन्हा धमकी

Buldhana Sanjay Gaikwad : चून चून के, गिन गीन के मारे जायेंगे.. राड्यानंतर बंडखोर आमदार गायकवाड यांची पुन्हा धमकी

शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर " चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिलीय.."

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संजय खंदारे (बुलढाणा) : ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर " चून चून के गिण गीण के मारे जायंगे, म्हणत शिंदे गटाचे बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिलीय.." (Buldhana Sanjay Gaikwad) तर  कालच्या राड्यात कमी झाले कारण त्याठिकाणी पोलीस होते, मात्र पुढच्या वेळेस आणखी जास्त राडा होईल" असा इशारा ही गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. यामुळे बंडखोर आमदार संजय गायकवाड आणि शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.

बुलढाण्यामध्ये काल शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चालु असताना, आमच्या नेत्यांवर टीका का करता, म्हणत शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात राडा करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावला. त्यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनी ही धमकी दिल्याने शिवसैनिक आणि बंडखोर आमदार गायकवाड यांच्यात जोरदार राडा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  काँग्रेसला पडणार मोठे खिंडार, अशोक चव्हाणांसोबत 15 आमदार सोडणार ‘हात’?

संबंधित बातम्या

बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.

जाहिरात

हे ही वाचा :  मविआचा आणखी एक निर्णय रद्द, उद्धव ठाकरेंना धक्का, उस्मानाबादकरांच्या पदरी निराशा

बुलढाण्यामध्ये झालेल्या राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या