चिपळूण, 23 जुलै : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri District) पूरस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती 2005 पेक्षाही भयंकर असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत. चिपळूण आणि खेड शहरांत पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून अद्यापही काही नागरिक घरांच्या छतावर, इमारतीच्या टेरेसवर अडकून पडले आहेत. चिपळूणमधील पूरस्थितीची किती भयंकर आहे हे दाखवणारे व्हिडीओ समोर (Shocking video) आले आहे. चिपळूणमधील पूरस्थितीचे व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत. यापैकी एका व्हिडीओत दिसत आहे की, एक मोठी कार चक्क पुराच्या पाण्यात वाहून जात आहे. कार वाहून जात असल्याने पूर किती मोठा होता आणि पाण्याचा वेग किती होता याची कल्पना सुद्धा आपण करु शकत नाही.
तर दुसऱ्या एका व्हिडीओत एका तरुणीचं रेस्क्यु ऑपरेशन सुरू होतं. या तरुणीला पुराच्या पण्यातून इमारतीच्या टेरेसवर टायरला दोरी बांधून वर खेचण्यात येत होते. वर टेरेसपर्यंत ही तरुणी पोहोचली सुद्धा मात्र तितक्यात तिचा हात निसटला आणि ती खाली पडली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महाडमधील पूरस्थिती गंभीर; 10 हजारहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यात रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिपळूणमध्ये 15 बोटी उपलब्ध असून त्यापैकी 8 बोटी मार्फत बचाव कार्य सुरु आहे. सध्या चिपळूण येथे नेटवर्क नसल्याने फोन लागत नाहीत. पोलीस वायरलेस मार्फतच संदेशवहन सुरु ठेवणेबाबत सूचीत केलेले आहे. जगबुडी नदीच्या पुरामध्ये खेडच्या बाजारपेठेत 7 ये 8 फूट पाणी होते. हे पापणी आता ओसरले आहे. मात्र या पुराच्या पाण्यात लहान लहान व्यावसायिक उद्धवस्त झाले आहेत.