JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 2 वर्षांनी झाली रंगाची उधळण; तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी, पाहा VIDEO

2 वर्षांनी झाली रंगाची उधळण; तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी, पाहा VIDEO

Rangpanchami at Tulajabhavani Temple: आज रंगपंचमी निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विविध रंगांची उधळण करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे रंगपंचमी आणि इतर सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तुळजापूर, 22 मार्च: मागील जवळपास दोन वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गानं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली आहेत. कोरोना विषाणूने जवळपास सर्वच क्षेत्रांवर दुरगामी परिणाम केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात अनेक दिवस देशातील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. अलीकडेच देशात कोरोना संसर्गाचा आलेख घटल्यानंतर देशातील मंदिर आणि देवस्थानं पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अशातच आज रंगपंचमी निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विविध रंगांची उधळण करण्यात आली (rangpanchami celebration at tulajabhavani temple) आहे. यावेळी मंदिरातील पुजारी आणि महंतांनी तुळजाभवानी देवीला विविध रंग लावण्यात आले. यावेळी पुजाऱ्यांनी तुळजाभवानी देवीला भाताचा नैवैद्य देखील अर्पण केला. याची खाशियत म्हणजे हा रंग विविध रंगाचा होता. हेही वाचा- कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट; आता मोदी सरकार उचलणार मोठं पाऊल देवीचे महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे रंगपंचमी आणि इतर सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. पण आता थोड्याफार प्रमाणात निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे देशभरात रंगपंचमी उत्सहात साजरी करण्यात येत आहे. तुळजापूर शहरात देखील असंख्य नागरिकांनी एकमेकांवर रंगांची उधळण करत मोठ्या आनंदानं हा सण साजरा केला आहे. यावेळी नागरिकांकडून नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यावर जोर दिला होता.

संबंधित बातम्या

तुळजाभवानी मंदिरात साजरी करण्यात आलेल्या रंगपंचमीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, मंदिरातील पुजारी आणि महंत एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. यातील काहींनी तुळजाभवानी देवीला देखील रंग लावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या