मुंबई, 11 जून: राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार (Shiv Sena’s Sanjay Pawar) यांचा पराभव करत भाजप उमेदवार धनंजय महाडिक (BJP candidate Dhananjay Mahadik) यांनी विजय (Won) मिळवला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. विजयाबद्दल ट्विट करताना त्यांनी लिहिलं की, निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती… जय महाराष्ट्र !
भाजपचे संख्याबळ 123 इतकी झाले होते. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 28 मते राहत होती. पण, पियूष गोयल यांना 48 मतं मिळाली आणि अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली. त्यानंतर पहिल्या पसंतीची 27 मतं ही धनंजय महाडिक यांना मिळाली आहे.तर महाडिक यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. त्यामुळे अपक्षांची 9 मतं फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धनंजय महाडिक हे 41 मतं घेऊन विजयी झाले आहे. तर संजय पवार यांना 33 मतं मिळाली आहे. असा झाला गेम भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता. त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते अनिल बोंडे आणि 48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. 27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात 3 मतं बविआने महाडिक यांना दिली. 1 मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कुणाला किती मतं मिळाली? पियूष गोयल - 48 अनिल बोंडे - 48 संजय राऊत 41 प्रफुल्ल पटेल - 43 इम्रान प्रतापगढी 44 संजय पवार - 33 धनंजय महाडिक - 41