JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सावरकरांवरुन वाद पेटला; मनसे नेते नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ते आक्रमक

सावरकरांवरुन वाद पेटला; मनसे नेते नितीन सरदेसाई पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्ते आक्रमक

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्य़ा वक्तव्यानंतर राजकीय वाद पेटला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलढाणा, 18 नोव्हेंबर : राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाट पेटला आहे. आज मनसेचे कार्यकर्ते राहुल गांधींची सभा असलेल्या ठिकाणी जात असताना त्यांना पोलिसांनी रोखल्याची माहिती समोर आली आहे. यानंतरही मनसे कार्यकर्ते आक्रमक होते. यानंतर शेवटी मनसे नेते नितीन सरदेसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती समोर आली आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपबरोबर मनसे नेत्यांनीही टीका केली आहे. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळीच मनसे कार्यकर्ते काही नेत्यांसह राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दिशेने निघाले होते. दरम्यान बुलढाण्यातील चिखोली भागात मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अडवलं होतं. यानंतर मनसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. दरम्यान काही वेळानंतर सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. Pune BJP : सावरकर प्रकरणावरून पुण्यात काँग्रेसभवनसमोर राडा, भाजप कार्यकर्ते ताब्यात LIVE VIDEO पुणे काँग्रेस भवनातील भारत जोडो याञा वाहनावरील राहुल गांधी यांच्या फोटोलाही काळ फासलं. तसच नेहरू  यांनीही माफी मागितल्याचे पोस्टर लावले होते ते सर्व पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच काढूनही टाकले. पुणे पोलिसांनी याप्रकरणी 15 भाजप कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. दरम्यान काही काळ जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या