JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : थायलँडवासियांचे 'बाप्पा'प्रेम पाहून पुणेकर चाट; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

Video : थायलँडवासियांचे 'बाप्पा'प्रेम पाहून पुणेकर चाट; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन

न अडखळता ते बाप्पाची आरतीही म्हणत होते..अजब Video

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 5 सप्टेंबर : बाप्पाचे भक्त फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत, हे पुण्यातील एका व्हिडीओमधून सिद्ध होतं. थाडलँडहून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि मनोभावे बाप्पाची आरतीही केली. बाप्पाची आरतीदेखील त्यांची तोंडपाठ होती. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. गणेशोत्सव हा सुंदर सण आहे, अशी भावना थायलंड या देशातून आलेल्या परदेशी गणेशभक्तांनी व्यक्त केली आहे. थायलँडमधून आलेल्या गणेश भक्तांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष केला. विशेष म्हणजे बाप्पाची आरती त्यांना तोंडपाठ होती.

अगदी बेंबीच्या देठापासून ते बाप्पाचा जयघोष करीत होते. दगडूशेठ’चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झालेले आहेत. याठिकाणी करण्यात आलेली सुंदर सजावट पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यावर्षी साकारण्यात आलेल्या ‘श्री पंचकेदार मंदीर’ सजावटीसमोर गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली. हे मंदिर केवळ देखावा नसून याच्या उभारणीत अनेक प्रतिकांचा, मूर्तींचा आणि अनेक दिव्यांचा वापर केलेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या