JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune: Horror सिनेमा पाहून बाहुलीला फास लावला अन् मग 8 वर्षीय चिमुकल्यानेही घेतला गळफास, पिंपरीतील धक्कादायक घटना

Pune: Horror सिनेमा पाहून बाहुलीला फास लावला अन् मग 8 वर्षीय चिमुकल्यानेही घेतला गळफास, पिंपरीतील धक्कादायक घटना

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आठ वर्षीय मुलाने बाहुलीला फाशी देत मग स्वत: देखील गळफास घेतला आहे.

जाहिरात

Representative Image

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 1 जून : पुणे जिल्ह्यातून (Pune district) एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आई कामात व्यस्त असताना आठ वर्षांच्या चिमुरडयानं आधी बाहुलीला फाशी दिली आणि त्यानंतर स्वत: देखील गळफास घेत आयुष्याचा शेवट (8 year old child hang a doll and later commits suicide) केला आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचं समज झाल्यानंतर या मुलाने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरीतील थेरगाव (Thergaon Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. घटनेत मृत पावलेल्या मुलाला मोबाइलवर ‘हॉरर’ फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना थेरगाव येथे घडली. वाचा :  पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने इंजिनिअर तरुणासोबत घडला विचित्र प्रकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा मुलगा आपल्या बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणी देखील खेळत होती. त्यावेळी मुलाची आई कामात व्यस्त होती. तर, वडील बाहेर गेले होते. दरम्यान, खेळत असताना त्याने अचानक बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर या मुलाने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला. काही वेळानंतर मुलाच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता मुलगा मोबाइलवर ‘हॉरर’ चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘हॉरर’ फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगतले जात आहे. दरम्यान आता या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या