JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्याला जाणारी चालती शिवशाही अचानक पेटली; 40 प्रवाशी, अन्...अंगावर काटा आणणारा Video!

पुण्याला जाणारी चालती शिवशाही अचानक पेटली; 40 प्रवाशी, अन्...अंगावर काटा आणणारा Video!

पुणे महामार्गावर निगडे गावाच्या हद्दीतील उड्डाणपूलावर बस आली असता अचानक गाडीतून धूर येऊ लागला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 14 मार्च : सातारा महामार्गावर (Satara) चालत्या शिवशाही बसमधून अचानक धूर येऊन तिने पेट घेतल्याची घटना घडली. भोर तालुक्यातील राजगड साखर कारखान्यासमोरील उड्डाणपूलावर सोमवारी दुपारी ४.१५ वा. ही घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली आहे. सांगली डेपोहून निघालेली सांगली - स्वारगेट शिवशाही (Sangali-Swargate Shivshahi) बस स. ११.३० वा. सांगलीतून निघाली. सातारा – पुणे महामार्गावर निगडे गावाच्या हद्दीतील उड्डाणपूलावर बस आली असता अचानक गाडीतून धूर येऊ लागला. गाडीचे चालक शेरअली सिराज फकीर यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने गाडी थांबवली व गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. थोड्याच वेळात गाडीने पेट घेतला. गाडीमध्ये स्त्रीया, पुरुष व लहान मुले असे एकुण ४० प्रवासी होते.

संबंधित बातम्या

या सर्व प्रवासी जीवाच्या आकांताने बसबाहेर धावले असले, तरी त्यांचे सर्व साहित्य मात्र जळालेल्या बसमध्ये राख झाले आहे. एकंदर प्रवाशांचे यात मोठं नुकसान झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या