JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raj Thackeray : उद्या पुण्यात राजगर्जना; मात्र पाळावे लागतील हे 13 नियम, अन्यथा...

Raj Thackeray : उद्या पुण्यात राजगर्जना; मात्र पाळावे लागतील हे 13 नियम, अन्यथा...

सभेला परवानगी दिली असली तरी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी-शर्थी देण्यात आल्या आहेत.

जाहिरात

मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता (File Photo)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 21 मे : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या पुण्यात (Raj Thackeray in Pune) सभा होणार आहे. सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडाच्या सभागृहात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी राज ठाकरेंची सभा 21 मे रोजी सायंकाळी होणार होती. सभेला परवानगी दिली असली तरी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी-शर्थी देण्यात आल्या आहेत. या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. 1 सदर सभा ही 22-05-2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आली असून कार्यक्रम स्थळ आणि वेळेत बदल करू नये. 2 सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांनी भाषण करताना दोन समाजामध्ये धार्मिक, जातीय तेढ निर्माण होणार नाही, तसेच विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. 3 सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थळ किंवा ते पाळत असलेल्या रूढी परंपरांचा अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी. 4 सभेत सामील होणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यांनी स्वयंशिस्त पाळावी, तसेच सभास्थळी वेगवेगळ्या भागातून येताना किंवा जाताना इतर धर्म/जात/पंथ यावर टीका-टीप्पणी तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत. तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणा दाखविणार नाहीत. 5 कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटकं पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये. शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतूदींचं उल्लंघन होणार नाहीत, याची काळजी घेतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या