JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो बॉयकडून तरुणीचा किस, पुण्यातली खळबळजनक घटना

पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो बॉयकडून तरुणीचा किस, पुण्यातली खळबळजनक घटना

झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयने केलेल्या गैरवर्तनामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे. जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात

Zomato Delivery Boy Pune

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 सप्टेंबर : झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयने केलेल्या गैरवर्तनामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे. जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 40 वर्षांचा रईस शेख हा कोंढव्यात राहतो. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास रईस जेवणाची ऑर्डर घेऊन पीडित मुलीच्या घराच्या दरवाजावर आला. मुलीने जेवणाची ऑर्डर घेतल्यानंतर रईसने तिच्याकडे पाण्याची मागणी केली. पाणी पिऊन झाल्यानंतर थॅन्क्यू म्हणण्यासाठी रईसने मुलीचा हात धरला आणि दोन वेळा गालावर चुंबन घेतलं, असं मुलीने तिच्या तक्रारीमध्ये म्हणलं आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमणावार फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली जाते. फूड डिलिव्हरी अॅप करणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कागदपत्रांची तपासणी करतात का? तसंच या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती करून घेतात का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या