JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : सरदार मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवाला सुरूवात, पाहा काय आहे 308 वर्षांची परंपरा VIDEO

Pune : सरदार मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवाला सुरूवात, पाहा काय आहे 308 वर्षांची परंपरा VIDEO

पुण्यातील एक गणपती असा आहे की ज्याची प्रतिष्ठपना ही गणेश चतुर्थीला नाही तर भाद्रपद प्रतिपदेला होते. तब्बल 308 वर्षांपासूनची ही परंपरा आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 29 ऑगस्ट : सध्या संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाच्या आगमनाचे (Ganeshotsav 2022) वेध लागले आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला महाराष्ट्रासह संपूर्ण जगभर लाडक्या बाप्पाचे आगमन होते. पण, पुण्यातील एक गणपती असा आहे की ज्याची प्रतिष्ठपना ही गणेश चतुर्थीला नाही तर भाद्रपद प्रतिपदेला होते. ही तब्बल 308 वर्षांपासूनची परंपरा आहे. काय आहे परंपरा? पुण्यातील शनिवारवाड्याजवळ सरदार मुजुमदार यांचा पेशवेकालीन वाडा आहे. या वाड्यातील गणेशोत्सव हा विशेष गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्यपणे गणेशोत्सव हा भाद्रपद चतुर्थीला सुरू होऊन दहा दिवस साजरा होतो. पण, मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सव भाद्रपद प्रतिपदेच्या दिवशी सुरू होतो आणि ऋषीपंचमी म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या पाचव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होते. यंदाही प्रथेप्रमाणे रविवारी मुजुमदार वाड्यात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘मुजुमदार वाड्यातील गणेश उत्सवाचे मंडप हे वरच्या मजल्यावर असून तळमजल्यावरील देव्हारातून लपलेल्या जिन्यातून बाप्पाला देव्हाऱ्यातील उत्सव मंडपात आणले जाते. या मंडपात उत्सव मूर्ती देखील असते. पाच दिवस भजन, किर्तन आणि साग्रसंगीत पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी बाप्पाला पुरणाचे मोदक केले जातात.ऋषीपंचमीच्या दिवशी उत्सव मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यानंतर गणेशाच्या मूळ मूर्तीची वाड्यातील  छोट्या जिन्यातून देव्हाऱ्यात प्रतिष्ठापना केली जाते,’ अशी माहिती सरदार मुजुमदारंच्या वंशज अनुपमा मुजुमदार यांनी सांगितली. ‘आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा’, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा मोठा खुलासा 1714 साली या गणेशोत्सवाला सुरूवात झाली. गेली 308 वर्षा अव्याहतपणे सुरू आहे.  त्या काळात पेशवे देखील या उत्सवामध्ये सहभागी होत असत. पेशवेकालीन उत्सवाची परंपरा असलेल्या या वाड्याची हेरिटेज वास्तू म्हणून नोंदणी करण्यात असली तरी याची काही प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काळामध्ये भाविकांना दर्शनासाठी या वाड्यामध्ये प्रवेश दिला जातो.

गुगल मॅप वरून साभार

संबंधित बातम्या

पत्ता - सरदार मुजुमदार वाडा, शनिवार वाड्याजवळ, बाजीराव रस्ता, बुधवार पेठ, पुणे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या