JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ही कसली पाटी? पुण्यात विद्यार्थ्यांसाठी दारूची अनलिमिटेड ऑफर; MIT चा उल्लेख, पोलिसांकडून कारवाई 

ही कसली पाटी? पुण्यात विद्यार्थ्यांसाठी दारूची अनलिमिटेड ऑफर; MIT चा उल्लेख, पोलिसांकडून कारवाई 

पुण्यातील पाट्या चर्चिला जातात, मात्र ही कसली पाटी?

जाहिरात

40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या तंदुरुस्त व्यक्तींसाठी अल्कोहोल पिण्याचे काही प्रमाणात फायदे असू शकतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 जुलै : पुण्यात कधी काय होईल, काही सांगता येत नाही. पुणे जिल्ह्यातील लोणीकाळभोर परिसरातून दारूची एक विचित्र ऑफर समोर आली आहे. ही ऑफर चक्क महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे. हॉटेल व्यावसायिकाच्या या अजब ऑफरवर अनेकांनी टीका केली आहे. परिणामी हॉटेल चालकाला याचा फटकाही सहन करावा लागला आहे.

लोणी काळभोर हद्दीतील कदमवाकवस्ती इथे एका परमिट रूम हॉटल मालकाने एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी चक्क ७९९ रुपयांत दोन तास अनलिमिटेड दारू असा बोर्ड लावला होता. ही ऑफर केवळ एमआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी होती. लोणी-काळभोर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करीत हॉटेल चालकाला ताब्यात घेतलं.

देवी प्रसाद सुभाष शेट्टी ( वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना गुरुवारी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी परिसरातील ‘द टीप्सी टेल्स’ हॉटेलच्या समोर एक बोर्ड लावला होता. यावर फक्त  एमआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ७९९ रुपयांमध्ये २ तास अनलिमिटेड ड्रिंक्स असं लिहिलं होतं. हॉटेलकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रताप केल्याचं हॉटेल चालकाने सांगितलं. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑफरमुळे विद्यार्थीही चांगलेच अचंबित झाल्याचे पाहायला मिळाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या