पुणे, 22 जुलै : पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संश्यावरुन सराईत गुन्हेगारांनी आपल्याचं मित्राचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेसंदर्भात पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्यात पीडित मनोहर वेताळ याने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अजय पवार आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे माळवाडी परिसरातील एका रुमवर नेत लोखंडी सळई, बेल्टने मारहाण केली. मी खूप ओरडत होतो, पण कुणीही वाचवायला आलं नाही. मग त्यांनी माझ्या गुप्तांगावर, तोंडावर स्प्रे फवारला असं पीडित व्यक्तीने सांगितलं आहे. गुप्तांगावर व्होलीनी स्प्रे मारला… विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी अजय पवार आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाला अटक केल्या गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित तरुणाला लोखंडी सळई, बेल्टने मारहाण करण्यात आली. गुप्तांगावर, तोंडावर स्प्रे फवारला असं पीडित व्यक्तीने सांगितलं आहे.