अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे
जुन्नर, 15 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्य मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उसाच्या ट्रॉली खाली सापडून एका 22 वर्षे वय असलेल्या एका गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन ट्रॉली एक मेकाला जोडलेल्या असल्याने मागच्या ट्रॉली खाकी सापडून या महिलेचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-सावरगाव रोडवर वारूळवाडी इथं ही घटना घडली. विद्या रमेश कानसकर असं या महिलेचं नाव आहे. सदर महिला जुन्नर तालुक्यातील निमदरी येथील असून आपल्या पती व आईसोबत नारायणगाव येथे उपचारासाठी आली होती. वारूळवाडी येथून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले असून अशा अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. (मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, दोन गंभीर) राज्यभर सर्वत्र सहकारी साखर कारखाने सुरू झाले असून अनेक ट्रक आणि ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक करत आहेत. शिवाय ट्रॅक्टरचालक 2 किंवा 3 ट्रॉली एकमेकाला जोडून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक करतात. यासह मोठ्या आवाजात गाणि लावून प्रवास करतात त्यामुळे असे अपघात घडतात. एरवी आपले कर्तव्य चोख बजावनारे आरटीओ आणि पोलीस मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. ( राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत चेंगराचेंगरी, एक कार्यकर्ता गंभीर जखमी ) नारायणगाव-सावरगाव रस्त्यावर मागील अनेक वर्षापासून रस्त्याच्या साईड पट्ट्या भरल्या गेल्या नाहीत त्यामुळे रस्त्याला असणाऱ्या धारदार कडांवर दुचाकी घसरून हे अपघात होत आहेत. सहा महिन्यापूर्वी देखील या परिसरात अशीच घटना घडली होती. त्यामुळे अजून किती जीव जाणार असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.