JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MHADA Pune Lottery: पुणे म्हाडाच्या 5 हजार 211 घरांच्या सोडतीचा शुभारंभ, लकी ड्रॉ विजेत्यांची होणार घोषणा

MHADA Pune Lottery: पुणे म्हाडाच्या 5 हजार 211 घरांच्या सोडतीचा शुभारंभ, लकी ड्रॉ विजेत्यांची होणार घोषणा

MHADA Pune Lottery July 2022 Result: महाराष्ट्र हाउसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे पुणे लॉटरी, जुलै 2022च्या विजेत्यांची घोषणा आज म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. म्हाडा पुण्यातील 5211 घरांसाठी लकी ड्रॉ विजेत्यांची घोषणाकरणार आहे.

जाहिरात

MHADA Pune Lottery: पुणे म्हाडाच्या 5 हजार 211 घरांच्या सोडतीचा शुभारंभ, लकी ड्रॉ विजेत्यांची होणार घोषणा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट: महाराष्ट्र हाउसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) पुणे लॉटरी, जुलै 2022 च्या विजेत्यांची घोषणा (MHADA Pune Lottery July 2022 Result)  आज म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा शुभारंभ झाला असून म्हाडा पुण्यातील 5,211 घरांसाठी लकी ड्रॉ विजेत्यांची घोषणा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. ज्या नागरिकांनी म्हाडा पुणे लॉटरी 2022साठी अर्ज केला आहे, ते लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून लकी ड्रॉ पाहू शकतात. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या 5, 211घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.‘सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वस्त दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थानं तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरं देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे म्हाडा मंडळाच्या 5,211 सदनिकांसाठी सुमारे 90 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले आणि 71 हजारांपेक्षा अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन यात सहभाग नोंदविला, हे शासन आणि म्हाडाची विश्वासार्हता वाढीला लागल्याचं उत्तम उदाहरण आहे, असं मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. आज सोडत काढण्यात आलेल्या सदनिकांपैकी तीन हजार घरे तयार असून पुढील दीड महिन्यात त्यांचे वाटप केले जाईल तर उर्वरित सदनिकांचे काम एक-दीड वर्षात पूर्ण करुन त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा-  पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती स्वतःचे घर हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घरांची संकल्पना मांडली आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत असे सांगून  हे सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल असणारा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यंत्रणांनी जोमाने काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  ‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात म्हाडाचा मोठा सहभाग आहे, राज्यात  विविध गृह प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी गृहनिर्माण योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या