घंटानादाची दखल
मुंबई, 13 जुलै: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसंदर्भात विद्यार्थी सलग तीन दिवसांपासून मुख्य इमारत आवारात भर पावसात बेमुदत घंटानाद आंदोलन करत होते. आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत विद्यार्थ्यांना सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबवलं **(Protest of Students stopped in Pune University)**आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर विद्यापीठ प्रशासनातर्फे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे आणि कुलसचिव प्रफुल पवार यांनी भेट देऊन समितीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शुल्कवाढीसंदर्भात समितीशी चर्चा करून लवकरच शुल्कवाढ मागे घेऊ, असे लेखी अश्वासनात कळवले. पाऊस आला धो..धो..धो! पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! सर्व शाळांना सुट्टी जाहीर तसंच अनिकेत कँटीन, झेरॉक्स सेंटर आणि इंटरनेट कॅफेचेही टेंडर काढत असून येत्या दहा दिवसात तेही सुरू करू, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थीहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर विद्यापीठ प्रशासन सातत्याने विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीसोबत प्रत्येक महिन्यात सातत्याने चर्चा करेल आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आवर्जून काम करेल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कृती समितीच्या वतीने पोलीस, विद्यापीठ प्रशासन, सर्व सहभागी विद्यार्थी, राजकीय संघटना आदींचे आभार मानत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप झाला. त्यामुळे आता भरमसाठ फी आणि इतर गोष्टींमुळे त्रस्त असणारे विद्यार्थी आता शांत झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भर पावसात सुरू असलेल्या आमच्या सर्व आंदोलकांचे हे यश आहे. ही शुल्कवाढ रद्द झाल्यामुळे अनेक गोर-गरिबांच्या मुलांचे होणारे आर्थिक शोषण थांबणार आहे.असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.