JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील वादळी पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळलं; कोट्यवधीच्या गाड्यांचं मोठं नुकसान

पुण्यातील वादळी पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळलं; कोट्यवधीच्या गाड्यांचं मोठं नुकसान

पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 30 सप्टेंबर : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला पाहायला मिळत आहे. यातच पुण्यात झालेल्या या जोरदार आणि वादळी पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळला आहे. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. मात्र, या जोरदार आणि वादळी पावसामुळे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग फॅन कोसळला आहे. सिलिंग कोसळल्याने शासकीय गाड्यांचा मोठं नुकसान झालं आहे. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने मोठी हानी टळली आहे. आत्ता गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पाऊसाने शहरातील अनेक पेठांमध्ये रस्त्यांवर पाणी च पाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, कालही पुणे शहरात दुपारच्या सत्रात तब्बल एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलेला पाहायला मिळालं. हेही वाचा -  पुण्यातील हा चौक स्फोटांनी हादरणार, अवघ्या काही सेकंदात होणार पुलाचा चुराडा हवामान विभागाच्या वतीने पुढील आठवडाभर पाऊसाचा अंदाज देण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आणि मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची 1-2 तीव्र सरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या