JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पवार एकाच फ्रेममध्ये, खरे पवार कोणते? ब्राह्मण महासंघाचा सवाल

बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पवार एकाच फ्रेममध्ये, खरे पवार कोणते? ब्राह्मण महासंघाचा सवाल

यापूर्वी ज्या शरद पवारांनी पुरंदरेंचा जाहीर सत्कार केला. त्यांना प्रशस्तीपर पत्रं लिहिली. तेच पवार आज पुरंदरेंवर कशासाठी टीका करताहेत? असा खडा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काल टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेवर आता ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे आनंद दवे यांनी शरद पवारांचे बाबासाहेब पुरंदरेंसोबतते जुने फोटो आणि कौतुकाचे पत्र शेअर करत खरे पवार साहेब कोणते हे महाराष्ट्राला कळू द्या, असं विधान केलं आहे. शरद पवारांनी काल शिवचरित्रातील चुकीच्या उल्लेखावरून पुन्हा एकदा दिवंगत शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करताच ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी पवारांचेच जुने व्हिडिओ आणि पत्रं व्हायरल करून शरद पवारांना त्यांच्या बदललेल्या भूमिकेवरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवलाय. यापूर्वी ज्या शरद पवारांनी पुरंदरेंचा जाहीर सत्कार केला. त्यांना प्रशस्तीपर पत्रं लिहिली. तेच पवार आज पुरंदरेंवर कशासाठी टीका करताहेत? असा खडा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय. आनंद दवे नेमकं काय म्हणाले? “शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांना न्याय द्यावा. आम्ही पवारांची भेट नाकारली हेच बरोबर होतं, हे आज पुन्हा सिद्ध झालं. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांवर अन्याय केला. हे पवार यांचे वक्तव्य केवळ चुकीचं नसून निंदनीय आहे. बाबासाहेब यांचा अभ्यास आणि मांडणी खोटी असेल तर आता शरद पवार यांनी आता शिवचरित्र लिहावं. त्यात महाराजांना ब्राह्मण शत्रू, सेक्युलर, इस्लामचे प्रेमी, आरक्षणाचे समर्थक दाखवावे आणि महाराजांना न्याय द्यावा”, असं आनंद दवे म्हणाले आहेत.

“शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलेला व्हिडीओ आमच्याकडे आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण करून स्वतःचीच माफी मागावी. तुम्ही खूप बदलत राहता पवार साहेब, आम्हालाच प्रश्न पडलाय की खरे पवार साहेब कोणते, कळू द्या एकदा महाराष्ट्रला खरे पवार साहेब कोणते”, अशी टीका दवे यांनी केली आहे.

( ‘मनसेतही वादविवाद’; महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचा गौप्यस्फोट ) “शरद पवारांनी 16 मे 1974 रोजी दादर येथील बाबासाहेब पुरंदरे यांनी उभ्या केलेल्या शिवसृष्टीला भेट दिली. तेव्हा तुम्ही यांचे भरभरून कौतुक केलं. ते सुद्धा लेखी. आणि सातारा येथून आणलेल्या भवानी तलवारीचं पूजन सुद्धा केलं होतं. त्या वेळेस तुम्हाला बाबासाहेब शिव अभ्यासक, शिवभक्त वाटत होते. आज महाराजांचे शत्रू वाटत आहेत”, असं आनंद दवे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या