पुणे, 18 नोव्हेंबर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालायवर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पंडित जवाहरलाल नेहरुंनी सावरकरांची माफी मागितल्याचे पोस्टर लावण्यात आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
पुणे काँग्रेस भवनातील भारत जोडो याञा वाहनावरील राहुल गांधी यांच्या फोटोलाही काळ फासलं. तसच नेहरू यांनीही माफी मागितल्याचे पोस्टर लावले होते ते सर्व पोस्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगेच काढूनही टाकले. पुणे पोलिसांनी याप्रकरणी 15 भाजप कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत. दरम्यान काही काळ जोरदार घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
हे ही वाचा : शिंदे सरकारचा ठाकरे गटाला मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्ट्सना स्थगिती
राहुल गांधी काय म्हणाले होते
याआधी राहुल गांधींनीही नुकतंच सावरकरांबाबत मोठं विधान केलं होतं. ‘सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत.
सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली’, असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
हे ही वाचा : ‘राहुल गांधींच्या DNA मध्येच…’; खासदार अनिल बोंडेंची राहुल गांधींवर जहरी टीका
फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर -
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील असे एक नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसकडून त्यांचा विचार कारावासात टाकायचं काम सुरु आहे. त्यांना राज्यातील जनताच उत्तर देईल. त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ‘स’ माहिती नाही. ते किती वर्षे तुरुंगात होते ते ही त्यांना माहिती नाही," असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.