12 सप्टेंबर : डोंगरकडा कोसळल्यामुळे जमीनदोस्त झालेल्या माळीण गावाचं आता पुनर्वसन होणार आहे. माळीण गावाच्या गावकर्यांचं जवळच्याच झांबरेवाडी इथे पुनर्वसन केलं जाणार आहे. हे गाव वसवण्यासाठी 8 एकर जागा नक्की करण्यात आलीय. गावकरी आणि वारसदारांसाठी 72 घरं बांधण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.
मागील महिन्यात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळ माळीण गाव आता नाहीसं झालंय. यात 151 लोकांचा मृत्यू झाला. अख्खं गावच जमिनीखाली गाडलं गेल्यामुळे गावकर्यांचे संसार उद्धवस्त झाली आहे. राज्य सरकारने पूर्ण गावाचं पूनर्वसन करण्याची घोषणा केलीये. मात्र सरकारी मदतीच्या पलीकडे अजून कोणतीही सुरूवात झाली नाही.
आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि काही कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. माळीणच्या वरच्या बाजूला असलेल्या झांबरेवाडी या गावात पूनर्वसन केलं जाणार आहे. माळीणच्या दुर्घटनेत वाचलेले गावकरी, त्यांचे वारसदार अशा सगळ्यांसाठी 72 घरं तिथे बांधण्यात येणार आहेत. याबद्दलचा निर्णय एक-दोन दिवसात होईल, असं जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितलंय. माळीणमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात अनेक बड्या कंपन्यांनी सहभाग घेतलाय. माळीणमधल्या पीडितांना लाखो रूपयांची मदत मिळालीय. या पैशांचा योग्य प्रकारे उपयोग करण्यासाठी व्यवस्थापनाची जबाबदारी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेनं पुढाकार घेतला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++