JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Raigad : दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू; रायगडमधील घटना

Raigad : दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू; रायगडमधील घटना

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारु अतिसेवन करण्याचे व्यसन होते. मागच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू (raigad)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 02 सप्टेंबर : राज्यात दारू बंदीसाठी अनेक ग्रामपंचायतींनी जोरदार आवाज उठवत दारुबंदी केली. दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याने राज्य शासनाकडून ही दारूबंदी कायद्याबाबत विचार विनीमय झाला. दारूमुळे अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहेत. दरम्यान दारूमुळे आयुष्याची वाट लागू शकते हे महिती असुनही सुद्धा लोक दारु पिताना दिसतात. रायगड (Raigad जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. दारू बंदी करणाऱ्या अधिकाऱ्याचाच दारू पिल्याने मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारु अतिसेवन करण्याचे व्यसन होते. मागच्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा नेमका मृ्त्यू कशामुळे झाला यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हा दारु अतिसेवन केल्यामुळे झाला आहे.

हे ही वाचा :  Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? पोस्टमार्टम केलेल्या डॉक्टरचा मोठा खुलासा

संबंधित बातम्या

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादक म्हणून कार्यरत होते. त्यांना अति दारु पिण्याची सवय होती. बुधवारी त्यांनी दारु अतिसेवन केली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृ्त्यू दारुच्या सेवनामुळे झाल्याने राजगड जिल्ह्यात या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे.

जाहिरात

वाईन मार्टमध्ये घुसून मॅनेजरचा खूण

वाईन मार्टमध्ये घुसून मॅनेजरचा खूण करण्यात आल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. सिडकोतील ढवळे कॉर्नर मुख्य रस्त्यावर प्रदीप वाईन मार्ट आहे. या ठिकाणी काल रात्री साडेआठच्या सुमारास एक युवक बियर घेण्यासाठी आला होता. पण तो मागत असलेली बियर वाईन मार्टवर नव्हती. यावेळी बियर नसेल तर दुकान बंद करा म्हणत त्या युवकाने शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर तासाभराने साडेनऊ वाजेच्या सुमारास तो युवक अन्य 4 ते 5 जणांसोबत आला.

जाहिरात

हे ही वाचा : Corona Vaccine : कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू, पुनावाला आणि राज्यसरकारला हायकोर्टाकडून नोटीस

यावेळी लोखंडी गेट जबरदस्तीने उघडून तीन ते चार जन वाईन मार्टमध्ये घुसले. 2 कर्मचाऱ्यांना बाहेर काढून लाकडाने मारहाण केली. त्यांनतर मॅनेजर जीवनराव वकोरे यांना बाहेर कडून त्यांच्या बरगडीत खंजीर खुपसला. वाकोरे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. यानंतर वाकोरे यांना तत्काळ रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या