JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Prithviraj Chavhan Congress : अखेर माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडण्यावरून केली मोठी घोषणा म्हणाले मी काँग्रेस सोडणार…

Prithviraj Chavhan Congress : अखेर माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडण्यावरून केली मोठी घोषणा म्हणाले मी काँग्रेस सोडणार…

मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे. (Prithviraj Chavhan Congress)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर : मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे. (Prithviraj Chavhan Congress) काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट 2020 मध्ये केली होती. सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले कि, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळे अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळे अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळे होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी. पक्ष लोकशाही पद्धतीने चालयचा असेल तर अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा :  फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिंदे सरकारची धावाधाव, शिंदे, फडणवीस आणि राणे घेणार मोदींची भेट

संबंधित बातम्या

काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. भाजपला एकमेव काँग्रेसच तोंड देऊ शकतो, असेही ते म्हणाले. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर बोलताना चव्हाण यांनी गोव्यात दुर्दैवी घडले असल्याची प्रतिक्रिया दिली. काश्मीरमधील सर्व लोक गेलेत. आता ही दुसरी घटना आहे. देशात हा पॅटर्नच सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

जाहिरात

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दुर्दैवी निर्णय आहे. फॉक्सकॉनची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. अचानकपणे गुजरात चित्रात नव्हते. एकदम हा प्रकल्प गुजरातला नेला. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हे झाले आहे.

हे ही वाचा :  फॉक्सकॉन प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले…

गुजरातचे महत्व वाढेल आणि मुंबईचे महत्व कसे कमी होईल असा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. एवढा मोठा प्रकल्प हायजॅक करण्याचा प्रयत्न याआधी कधीच झाला नव्हता, अशी शब्दांत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या