JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक आक्रमक

अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक आक्रमक

अवकाळी पावसाबरोबर अनेक विषयांवरुन विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. पहिल्या आठवड्यात महिला सुरक्षा, शेतकरी मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. या आठवड्यात विरोधक नेमक्या कोणत्या विषयावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. आज अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले आहे. या मुद्द्यावरुन आज अधिवेशनादरम्यान विरोधक आक्रमण होण्याची शक्यता आहे. याआधी झालेल्या अवकाळी पावसानंतर ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली होती. अद्याप ती मदत मिळाली नाही. त्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, या मुद्दावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसंच विधानसभेत आज लक्षवेधीअंतर्गत कोरोना व्हायरस, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची होणारी वाताहत यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अनेक शासकीय रुग्णालयात ह्रदयशस्त्रक्रिया बंद झाल्या आहेत. अनेक काॅलेजात वेगवेगळे डे साजरा करण्याच्या नावाखाली पार्टीचे आयोजन करीत येथे सर्रास अमली पदार्थांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. विधान परिषदेत या गंभीर विषयांवर लक्षवेधी चर्चा होऊ शकते. यानंतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज अधिवेशनादरम्यान चर्चा होऊ शकते. यातील पहिला मुद्दा म्हणजे वीज दर वाढीचा. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर महाग आहे. त्यादृष्टीने चर्चा होऊ शकते. तर अवकाळी पीक नुकसान मदत ही फक्त घोषणा असल्याची टीका विरोधकांकडून केली जाऊ शकते. विधान परिषदेत तब्बल २६ पेक्षा जास्त विभागाच्या पुरवण्या मागण्यांवर आज चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या