JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सूर्यग्रहणामुळे मंदिरात केली पूजा, नदीत स्नान करताना पिता पूत्रावर काळाचा घाला

सूर्यग्रहणामुळे मंदिरात केली पूजा, नदीत स्नान करताना पिता पूत्रावर काळाचा घाला

सगळीकडे पितृ दिवस साजरा होत असताना राज्यात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 21 जून: सगळीकडे पितृ दिवस साजरा होत असताना राज्यात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीत बुडून वडिलांसह एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय शिवाप्रसाद अग्रहारी आणि आदित्य संजय अग्रहरी असं मृत बापलेकाच नाव आहे. अग्रहरी कुटुंबाने सूर्यग्रहण असल्याने बेलोरा रोडवरील वाघाडी नदीच्या काठावरील शनी मंदिरात पूजापाठ-विधीचे आयोजन केले होते. सूर्यग्रहण संपल्यानंतर ही विधी आटोपली आणि संजय अग्रहरी आणि त्यांचा मुलगा आदित्य हे दोघे नदी काठावर स्नान करण्यासाठी गेले. अंघोळ करत असताना ते खोल पाण्यात गेले. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे ही बुडाले. यात दोघांचाही मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरून दोघांचेही मुर्तदेह बाहेर काढले आहेत. तर काही स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी घटना स्थळा कडे धाव घेत गर्दी केली. पिता पुत्राच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी दोन्ही मुर्तदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी नजीकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. संपादन- रेणुका धायबर हे वाचा- नकाशा बदलल्यानंतरही शांत नाही नेपाळ, रेडिओवर सुरू आहे भारताविरोधी भाषणं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या