New photos in Pooja chavan Suicide case: पूजा चव्हाण (Pooja chavan) प्रकरणात दररोज काही नवीन फोटो किंवा व्हिडिओ समोर येत आहेत. आता पूजाला मिळालेल्या काही भेटवस्तूंचे (Pooja chavan gifts) फोटो समोर आले आहेत. या महागड्या गिफ्ट्स पूजाला कुणी दिल्या यावरून रान उठलं आहे.
पूजा चव्हाण ( Pooja chavan Suicide case) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांचं नावं जोडलं गेलं आहे.
11 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यनंतर संजय राठोड ( sanjay rathod ) यांचं नावं या प्रकरणी जोडण्यात आलं होत.
भाजपने या प्रकरणात संजय राठोड (sanjay rathod) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली होती. त्यासाठी भाजपा नेता चित्रा वाघ (BJP leader Chitra wagh) यांनी आंदोलन देखील केलं होत.
मात्र अजूनही या प्रकरणात रोज नव्या गोष्टी बाहेर येतच आहेत. पूजा चव्हाण संबंधित रोज नवीन फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होत असतात.
आता पूजा चव्हाणला (Pooja chavan) मिळालेल्या काही भेटवस्तूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान हे गिफ्ट्स पूजाला नक्की कोणी दिले? या मौल्यवान भेटवस्तू देण्यामागचा नेमका हेतू काय याबाबत आता खूप साऱ्या चर्चा होत आहेत.
काही फोटोमध्ये तर पूजा चव्हाण (Pooja Chavan) संजय राठोड (sanjay rathod) सोबत सेल्फी घेताना दिसून आली होती.
हे फोटो बाहेर आल्यानंतर बराच गदारोळ माजला होता. आणि विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत संजय राठोडांच्या राजीनाम्याची (sanjay rathod resign) मागणी केली होती.
शेवटी संजय राठोडांनी (sanjay rathod) उद्धव ठाकरेंकडे(CM uddhav Thackeray) आपला राजीनामा सुपूर्द केला.
आता पुन्हा नवीन फोटो बाहेर आल्याने यावर संजय राठोड आणि विरोधी पक्ष यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतील याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
पूजाने शेअर केलेले काही फोटो याआधईदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुढे पाहा आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाणने शेअर केले हे फोटो
#khamoshiyan #unforgettablemoments हा हॅशटॅग वापरून पूजाने मास्कमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचे डोळे मात्र पाणावलेले दिसत आहेत.
त्याआधीची तिची पोस्ट 3 फेब्रुवारीची आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, 'मैं ढूँढ रही हूँ वो आँखें, जो मेरी आँखों को पढ़ सकें !!'
पूजाच्या सर्वच पोस्टवर तिच्या लाखो फॉलोअर्सनी कमेंट्स केल्या आहेत. काहींना अद्यापही विश्वास बसत नाहीये की पूजा आता या जगात नाही आहे. त्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी तिने असे नैराश्यपूर्ण फोटो पोस्ट केल्यानंतर तिची काळजीने चौकशी देखील केली आहे. पण पूजा असा टोकाचा निर्णय घेईल असे कुणाच्याही ध्यानी नव्हते
पूजाने त्याआधी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेली असतानाचे देखील काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने, 'काश कभी तो कुछ वैसा हो, जो मैंने सोचा वैसा हो !!' असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट 31 जानेवारीची आहे.
या तिनही फोटोंआधी केलेल्या पूजाच्या पोस्ट आनंदी होत्या. त्यामुळे असे अचानक काय झाले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना पडला आहे. तिने तिच्या कुटुंबीयांबरोबर देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.