JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खळबळजनक! चंद्रपूरच्या मशिदीत सापडले 11 तुर्कस्तानी मौलवी, गेल्या 22 दिवसांपासून होते लपून

खळबळजनक! चंद्रपूरच्या मशिदीत सापडले 11 तुर्कस्तानी मौलवी, गेल्या 22 दिवसांपासून होते लपून

केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र अशातच आता चंद्रपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रपूर, 26 मार्च : चीननंतर युरोपमधील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारताला धडक दिली आहे. हा व्हायरस देशात वेगाने पसरू नये, यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र अशातच आता चंद्रपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूरच्या एका मशिदी तब्बल 14 मौलवी गेल्या 22 दिवसांपासून लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी मशिदीतून 11 तुर्कस्तानी तर भारतातील इतर भागातील 3 अशा एकूण 14 मौलवींना ताब्यात घेतले आहेत. याबाबत ‘लोकमत’ या दैनिकाने वृत्त दिलं आहे. भारतावर एकीकडे कोरोनाचं संकट घोंगावत असताना हे मौलवी चंद्रपूरमधील मशिदीत का लपून राहिले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व मौलवींना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र हे मौलवी चंद्रपूरमध्ये नेमकं लपले होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हेही वाचा- कोरोनाला रोखण्यासाठी वेगवान हालचाली, उद्धव ठाकरे घेणार 4 हायप्रोफाईल बैठका? दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्याच प्रमाणे काही कठोर निर्णयही घेतले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई, पुण्यासह राज्यभरात संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. राज्यभरातील मंदिरं तसेच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सीरत कमिटीनं मशिदी बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे शुक्रवारीचा नमाझ घरीच पढण्याबाबत मुस्लीम बांधवांना सूचना मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या