मुंबई, 08 जुलै: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Reshuffle) झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर (Ministers Portfolio distribution) करण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला महत्वाची खाती आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याच्या आठ शिलेदारांची वर्णी लागली आहे. नारायण राणे, (Narayan Rane) कपिल पाटील (Kapil Patil), भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे. या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रीपदाची संख्या आठ झाली आहे. राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (रस्तेबांधणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री), पियुष गोयल (रेल्वेमंत्री व उद्योगमंत्री)आणि ग्राहक संरक्षण व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे या तिघांचे मंत्रीपद कायम राहिले आहे. रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातल्या 8 मंत्र्यांची नावं नितीन गडकरी पियुष गोयल रावसाहेब दानवे रामदास आठवले नारायण राणे कपिल पाटील भागवत कराड डॉ.भारती पवार नारायण राणे राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे खातं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं. कपिल पाटील भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेही वाचा- केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, नव्या सहकार खात्याच्या नाड्या कुणाच्या हाती वाचा… डॉ. भारती पवार डॉ. भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याची पदभार सोपवण्यात आला आहे. भागवत कराड भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.