फोटो सौजन्य - फेसबुक
पिंपरी चिंचवड, 4 जुलै : जेष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांना नुकतंच रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. शिवाय वाढत्या वयोमानानुसार त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजारही जडला आहे. इलाही जमादार यांचे चाहते मंगेश रुपटक्के यांनी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णलायत दाखल केलं असून सध्या मंगेशच त्यांची सुश्रुषा करत आहेत. इलाही यांचं साहित्य क्षेत्रात मोठं योगदान आहेच, त्याबरोबर त्यांनी आपल्या लेखणीने मराठी गझल विश्वही समृद्ध केले आहे. मागील काही काळात त्यांनी तब्बल 13 हजार दोहे लिहले होते. प्राध्यापक विकास कदम यांनी त्या दोह्याचं एकत्रितरित्या संपादन करून ‘दोहे इलाहीचे’ या द्विखंडांचे मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात प्रकाशन केलं.
फोटो सौजन्य - फेसबुक
हेही वाचा - पुण्याच्या महापौरांना कोरोनाची लागण, अजित पवारांसोबतच्या बैठकीलाही होते हजर दरम्यान, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी इलाही यांच्या सर्व उपचारासाठी सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असून सध्या इलाही हे त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती निकटवर्तीय प्रकाश दांडेकर यांनी दिली आहे. संपादन - अक्षय शितोळे