JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhokardan Crime : पत्नी घरी नसल्याने त्याने साधला डाव, विवाहित महिलेवर पहाटे अत्याचार

Bhokardan Crime : पत्नी घरी नसल्याने त्याने साधला डाव, विवाहित महिलेवर पहाटे अत्याचार

पीडित महिलेला एक नऊ महिन्याची चिमुकलीही आहे. ती आपली चिमुकली आणि पतीसह भोकरदन शहरात (Bhokardan) राहते. तिचा पती कामानिमित्त 16 मे रोजी नागपूरला (Nagpur) गेला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जालना, 22 मे : दिवसेंदिवस अत्याचाराच्या तसेच बलात्काराच्या घटनामध्ये वाढ (Rape increasing in India) होत आहे. विचारही केला नसेल, इतक्या धक्कादायक बातम्या समोर येत आहे. यात आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातून (Union Minster Raosaheb Danve Constituency) एक संतापजनक बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्याच्या भोकदनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. काय आहे घटना - एक विवाहित महिला घरात एकटी (Married Woman in Home) होती. यावेळी ती एकटी असल्याचा फायदा घेत एका व्यक्तीने या 21 वर्षीय विवाहितेवर अत्याचार (Physical Abuse of Married Woman) केल्याची घटना घडली. ही घटना भोकरदन (Bhokardan) शहरात शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सय्यद मुजीब बाबा असे संशयित आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला एक नऊ महिन्याची चिमुकलीही आहे. ती आपली चिमुकली आणि पतीसह भोकरदन शहरात (Bhokardan) राहते. तिचा पती कामानिमित्त 16 मे रोजी नागपूरला (Nagpur) गेला होता. तर सध्या उन्हाळा सुरू आहे. तापमानानेही उच्चांक गाठल्याने प्रचंड उकडत आहे. या उकाड्यामुळे या महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. तसेच ती आपल्या चिमुकलीसोबत झोपली होती. हेही वाचा -  Nashik Murder : भिशीचे पैसे भरण्यावरुन वाद, पत्नीने पतीचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव

याच दरम्यान शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आरोपीने घरात प्रवेश करुन विवाहित महिलेवर अत्याचार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या मतदारसंघातच ही परिस्थिती आहे, तर सामान्य ठिकाणी काय होईल, असा सवाल याठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या