JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाऊजी भोळा वेब सीरिजची YouTube वर धूम; वयाच्या 74 व्या वर्षी केली निर्मिती

भाऊजी भोळा वेब सीरिजची YouTube वर धूम; वयाच्या 74 व्या वर्षी केली निर्मिती

जिल्ह्यातील एका कलावंताने वयाच्या 74 व्या वर्षी यूट्युबवर मराठी वेब सीरिजची (Marathi web series) निर्मिती केली आहे. आत्तापर्यंत या वेब सीरिजचे 4 भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत.

जाहिरात

भाऊजी भोळा वेब सीरिजची YouTube वर धूम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 6 ऑगस्ट : माणसाच्या अंगात एखादी कला असल्यास ती कला माणसाला कधी रिकामं टेकडी बसू देत नसते. आज आपण एका अशाच कलाकारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जिल्ह्यातील एका कलावंताने वयाच्या 74 व्या वर्षी यूट्युबवर मराठी वेब सीरिजची (Marathi web series) निर्मिती केली आहे. श्याम शितोळे (Shyam Shitole) असे या कलावंताचे नाव असून. बापू शितोळे या नावाने ते सर्वत्र परिचित आहेत. श्याम शितोळे यांनी आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमांमध्ये आणि मराठी वेब सिरीजमध्ये काम केले आहे. श्याम शितोळे यांचे कळंब तालुक्यातील मलकापूर हे मूळ गाव. बापू शितोळे हे कलाकारांसोबत व्यवसायाने शेतकरी आहेत. अनेक वर्षे त्यांनी लोकमत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम पाहिले. या सर्व जवाबदारी पार पाडत असताना त्यांनी त्यांच्यामधील कलाकार कधी संपू दिला नाही. पत्रकारिता करत असताना किंवा शेतात शेतकरी म्हणून काम करत असताना त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना येत असतं. आपल्याला सुचलेली कल्पना, यात आपला अभिनय उत्तम प्रकारे बसवता येईल याचा सराव ते नेहमी करत असतं. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO अभिनयात आवड कशी निर्माण झाली श्याम शितोळे यांचे वडील देश स्वातंत्र्याच्या काळात गावोगावी तमाशाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करायचे. यामधून त्यांना मुबलक असा फायदा होत नसे. त्यामधून घर खर्च चालविणे अवघड होत असायचं. आपल्या मुलांनी अस काही करू नये त्यांनी भरपूर शिकून मोठं व्हावं असं त्यांना वाटत असायचे. म्हणून ते आपल्या मुलांना म्हणजे श्याम शितोळे यांना तमाशा, अभिनय यापासून दूर ठेवायचे. मात्र आपल्या वडिलांचा अभिनय पाहून श्याम शितोळे यांना देखील अभिनयात रुची निर्माण झाली. श्याम शितोळे हे मुंबईला एका नामांकित महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असताना एका नाटकामध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. त्या नाटकात त्यांना तृतीयपंथाची भूमिका मिळाली. आता अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी ही भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली. या भूमिकेबद्दल त्यांना तेंव्हाच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 151 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी स्वत:ची वेब सिरीज का करावी वाटली ? आम्ही जेंव्हा इतर वेब सीरिजमध्ये मानधन घेऊन काम करतो. तेंव्हा समोरील व्यक्ती सांगेन तेवढाच अभिनय करायला मिळतो. बाहेर काम करत असताना आपल्या विचारांना वाव मिळत नाही. काम तर आपण अनेक वर्षे केले पण आता स्वत:च्या विचारामधून समाज प्रबोधन करण्याचे ठरविले, म्हणून स्वत:ची वेब सीरिज करावी वाटली. म्हणून आम्ही दक्षता फिल्म प्रोडक्शन या नावाने युट्यूब चॅनल सुरू केले असून भाऊजी भोळा या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. आत्तापर्यंत या वेब सीरिजचे 4 भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याला प्रेक्षकांचा हजारोंच्या संख्येने प्रतिसाद मिळत असल्याचे श्याम शितोळे (संपर्क क्रमांक 82618 20974) यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या