JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Osmanabad : शेतकऱ्यांवरील संकटे संपता संपेना…; अतिवृष्टी, गोगलगाय आणि आता ‘यलो मोझॅक’

Osmanabad : शेतकऱ्यांवरील संकटे संपता संपेना…; अतिवृष्टी, गोगलगाय आणि आता ‘यलो मोझॅक’

‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात.

जाहिरात

यलो मोझॅक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद , 17 ऑगस्ट : जिल्ह्यात यावेळी मोठा पाऊस होऊन अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली. त्यानंतर काही पिके शंखी गोगलगायीने फस्त केली हे कमी की काय म्हणून, आता ‘यलो मोझॅक’ (Yellow mosaic disease on soybean) नामक व्हायरस पिकामध्ये पसरू लागला आहे. या व्हायरसमुळे सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.   सोयाबीनमध्ये 18-20 टक्के तेलाचे आणि 38-40 टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. जनावरांसाठी तसेच कुक्कुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. आंतर पीक, दुबार पीक तसेच पीक फेरपालटीमध्ये सोयाबीन अतिशय महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनच्या अधिक उत्पादनासाठी आपल्याला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, शिफारशीनुसार तणाचा, किडींचा तसेच रोगांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोयाबीन पिकावर येणाऱ्या महत्त्वाच्या रोगांची ओळख असणे देखील गरजेचे आहे. पांढरी माशी किडीद्वारे प्रसार  सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. मागील काही वर्षात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. सध्या पिवळा मोझॅक या रोगाचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव पीक वाढीच्या कालावधीमध्ये आढळून आला आहे. पिवळा मोझॅक हा रोग विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. झाडांच्या शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान जन्म घेतात. हेही वाचा- शाळेत मन रमेना म्हणून सुरू केला व्यवसाय; 17 व्या वर्षीच लाखोंची कमाई शासनाने नुकसानभरपाई द्यावी ‘यलो मोझॅक’ व्हायरसमुळे पानांवरती पिवळे डाग दिसून येतात. बारातेवाडी या गावातील अनेक शेतकऱ्यांना या विषाणूचा सामना करावा लागत आहे. काही शेतकर्‍यांचे तर संपूर्ण सोयाबीन वाया गेले आहे. हा प्रादुर्भाव नेमका उस्मानाबाद जिल्ह्यातच का दिसून येत आहे याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. या विषाणूचा एकदा पिकावर शिरकाव झाला की तो आटोक्यात येत नाही. त्यामुळे अनेकांनी सोयाबीनची वेळेआधीच कापणी करून बांधावरती ढीग घातलेत. झालेल्या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार  हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूंमुळे उद्भवतो. सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर तो जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.   हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली मेक्सिकोतील फळबाग; आधुनिक शेतीतून महिलेची लाखोंची कमाई जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी  सर्वाधिक सोयाबीन या पिकाला समाधानकारक दर मिळत असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाला कौल दर्शविला. त्यामुळे जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली. जिल्ह्यात 37 हजार हेक्टर जमीन ही सोयाबीन या पिकाच्या लागवडीखाली आहे. परंतु सततच्या पावसाने, आणि आता या संक्रमणामुळे पिकाला फळ लागेल का नाही ? आमचे कष्ट व्यर्थ जाईल का ? अशी चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.   असा ओळखा हा विषाणू   सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होऊन त्यांचा आकार लहान होतो. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत उपजतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट येते. शेतकर्‍यांनी वेळोवेळी आवश्यक त्या औषधांची फवारणी करावी, अशी माहिती कीटक शास्त्र विभागाचे डॉ. दिगंबर पटाइत यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या