दुकानात पाच गॅसचे सिलेंडर होते, पाचही सिलेंडर साबूत होते. त्यातही कुठली गळती आढळून आली नाही
विरार, 07 ऑगस्ट : मुंबई जवळील विरारमध्ये (virar) एका फास्टफूडच्या दुकानामध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला आहे. जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, दुकानात असलेले पाचही सिलेंडर शाबूत असतानाही हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे गुढ वाढले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात एका फास्टफूड फुडच्या दुकानात दुकानात शनिवारी रात्री ११ .३० च्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन स्फ़ोट झाला आणि दुकानाचे शटर उडून रस्त्यावरील पादाचाऱ्याला लागल्याने तो जखमी झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, दुकानातील सर्व सामान आणि काचेच्या वस्तूंची नासधूस झाली. तर इतर भांडी सुद्धा फुटली होती. सदरची घटना रात्री 11. 30 च्या सुमारास घडल्याने दुकानदार दुकान बंद करून घरी गेला होता. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दुकानात कोणत्याही प्रकरची आग लागली नव्हती अथवा विजेच्या तारांचे शॉक सर्किट झाल्याचेही आढळून आले नाही. ( ‘हे’ आघाडीचे कलाकार असणार बिग बॉस मराठीचा भाग? अनेक नावांची होतेय चर्चा ) दुकानात पाच गॅसचे सिलेंडर होते, पाचही सिलेंडर साबूत होते. त्यातही कुठली गळती आढळून आली नाही. अग्निशमन दलाने हे सर्व सिलेंडर सावधानीने बाहेर काढले. यामुळे नेमका हा स्फोट कशाने आणि कसा झाला याची कोणतीही माहिती मिळाली नाही. स्फोटचे कारण स्पष्ट न यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.