नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 8 मे : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका 22 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या (Suicide) केली आहे. घरातील किरकोळ कारणावरुन ही आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. आशा विशाल इंगळे असे मृत विवाहित तरुणीचे नाव आहे. तर याप्रकरणी, जळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? आशा विशाल इंगळे या पती विशाल, सासू, सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्याला होती. तिचा पती विशाल मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो. विशाल आणि दोन भाऊ सोबत एकत्रच राहतात. शनिवार रोजी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यामुळे संतापाच्या भरात आशा इंगळे यांनी आज घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हेही वाचा - प्रेयसीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळले, संतापात प्रियकराने केली प्रेयसीची हत्या हा प्रकार नवविवाहिता आशा हिची जाऊ मनिषा हिच्या लक्षात आल्याने तिनेही आरडाओरड केली. याचदरम्यान, शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी आशा इंगळे या नवविवाहितेला खाली उतरवले. यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. तर याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वीही शहरात आत्महत्येची घटना जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील कुसुंबा इथं एका 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. किशोर जालमसिंग चौधरी असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर चौधरी हा आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा येथे वास्तव्याला होते. शहरातील एका दाल मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला होते. गेल्या पाच महिन्यांपासून ते घरी होते. दुपारी घरात कुणीही नसताना छताला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.