JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून मी 4 वेळा उपमुख्यमंत्री झालो, बारामतीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी

...म्हणून मी 4 वेळा उपमुख्यमंत्री झालो, बारामतीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी

कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जितेंद्र जाधव, बारामती, 18 जानेवारी : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘मी कसा का असेना पण चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिले आहे. पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री होते म्हणून मीदेखील चार वेळा उपमुख्यमंत्री झालो,’ असं म्हणत अजित पवार यांनी सभेत हशा पिकवला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी मागील सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ‘तुमची राज्यात सत्ता होती. तसेच तुमच्या विचाराचे मंत्री होते. तुम्ही अशा पद्धतीचे राजकारण करू पाहात असाल तर आम्ही पण चार-चार वेळेला मुख्यमंत्रिपद पाहिलेले  लोक आहोत. आणि आता कसे का असेना, पण चार वेळा उपमुख्यमंत्रिपद पाहिले  आहे,’ अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर पवार यांनी आपण घरी असून घरी सभा खेळीमेळीत व्हावी म्हणून असं बोलल्याचं स्पष्टीकरण दिलं. राजकारणात कही ‘पे निगाहे, कही पे निशाणा’ ठेवावा लागतो - उद्धव ठाकरे भाषण करताना ठसका लागताच म्हणाले… कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना ठसकाही लागला.  त्यावेळी त्यांनी पाणी मागवून घेतलं आणि म्हणाले की आपले विरोधक म्हणतील पाणीपेईपर्यंत बोलत होता. ‘माळेगाव कारखान्यावर  सन्मानाने  साहेबांना घेऊन जाऊ’ माळेगाव कारखाना हा भाजपच्या ताब्यात असल्याची खदखद पवार कुटुंबीयांच्या मनात असल्याचं दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचाच असा चंग  दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. अजित पवार यांनी आज कारखान्याच्या  सभासद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ‘मागील पाच वर्षापासून आपले नेते शरद पवार हे माळेगाव  कारखान्यात गेले नाहीत.  त्यांनी सन्मानाने कारखान्यात जावे अशा पद्धतीचे आपण काम करायचे आहे,’ असं अजित पवार सभासदांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या