JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : 'शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा अपमान बंद करा', नाशिककरांची मोहीम

Video : 'शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा अपमान बंद करा', नाशिककरांची मोहीम

शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा लग्नसमारंभात अपमानित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात होणारी त्यांची विटंबना थांबवावी अशी मागणी नाशिककरांनी केलीय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 14 डिसेंबर : स्वराज्य मिळवण्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडलं. प्राणांची आहुती दिली. या मावळ्यांच्या शौर्याच्या गाथा ऐकताना आजही अंगावर काटा येतो. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश त्यांचा यासाठी नेहमीच ऋणी आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा भाग असलेल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा लग्नसमारंभात अपमानित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात होणारी त्यांची विटंबना थांबवावी अशी मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे. काय आहे मागणी? नाशिकच्या सिंहगर्जना युवा मंचनं लग्नसमारंभात मावळ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जातीय, असा आरोप केला आहे. लग्नामध्ये वेटर्सना मावळ्यांची वेशभूषा दिली जाते. त्यांना गेटवर उभं केलं जातं. या वेशभूषेतील मंडळी अक्षतांचंही वाटप करतात. एखाद्या व्यक्तीनं ही वेशभूषा केल्यानंतर त्याच्याकडं मावळा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे या पोषाखातील व्यक्तींना सर्व प्रकारची कामं सांगणे, हे चुकीचे आहे,’ असे  सिंहगर्जना युवा मंचचे अध्यक्ष प्रितम भांबरे यांनी सांगितले. सिंहगर्जना युवा मंचकडून हे प्रकार तातडीनं बंद करण्यात यावेत यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. या मंचच्या कार्यकर्त्यांनी या विषयावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिलं असल्याची माहिती भांबरे यांनी दिली. Nashik : बाळासाहेब ठाकरे स्मारक बंद, शिवकालीन शस्त्रांवरही साचली धूळ! पाहा Video नाशिककरांचा पाठिंबा महाराष्ट्र ही छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.महाराजांच्या मावळ्यांना देशभरातच नाही तर जगभरात मान आहे. शिवाजी महाराजांचे मावळे हे खास वेशभूषेमुळेच ओळखले जातात. लग्नकार्यक्रमात त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणून थांबवण्याच्या मोहिमेला नाशिककरांचाही पाठिंबा मिळतोय. राज्यातील पहिल्या पक्षीघराची दुरवस्था, पाहा कोण आहे कारणीभूत Video ‘हे सर्व प्रकार तातडीनं थांबले पाहिजेत. मावळे आपली अस्मिती आहे. त्यांना आदरानं वागणूक दिली पाहिजे. ही मोहीम योग्य असून त्याला आमचा पाठिंबा आहे, अशी भावना देवेंद्र देशपांडे या नाशिककरांनी व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या