JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : बाळासाहेब ठाकरेंची रोज पूजा करणारा कडवट भक्त, पाहा Video

Nashik : बाळासाहेब ठाकरेंची रोज पूजा करणारा कडवट भक्त, पाहा Video

बाळासाहेब ठाकरेंचे कडवट समर्थक मिनानाथ जाधव आपल्या दुकानामध्ये बाळासाहेबांची पुजा केल्याशिवाय ते कामाची सुरुवात करत नाहीत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 17 नोव्हेंबर : बेधडक वक्तव्य, कट्टर हिंदुत्ववादी आणि न पटणाऱ्या गोष्टींवर परखड भाष्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळेच त्यांचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला होता.  असाच एक चाहता नाशिक मध्ये बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरीत झालेला आहे. पेशाने हा चाहता व्यवसायिक असून आपल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाची सुरुवात बाळासाहेबांच्या पूजेने करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जाणून घेऊया या कडवट समर्थकाची कहाणी. गंगापूर रोड परिसरात बाळासाहेब ठाकरेंचे कडवट समर्थक मिनानाथ जाधव छोटंसं खाद्यपदार्थाचे दुकान चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. दररोज आपल्या दुकानामध्ये बाळासाहेबांची पुजा केल्याशिवाय ते आपला कामाची सुरुवात करत नाहीत. ते बाळासाहेबांना देव मानतात. त्यांनी स्वतःच्या हातावर बाळासाहेबांचे नाव गोंदवून घेतले आहे. गळ्यातील लॉकेटमध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे. हातात शिवबंधन आणि कपाळाला भगवा टिळा हा कायम त्यांच्या असतो.

PHOTOS : व्यंगचित्रकार ते हिंदूहृदयसम्राट; बाळासाहेब ठाकरेंचा भारावून टाकणारा जीवनप्रवास

1996 साली बाळासाहेब ठाकरे यांची नाशिकच्या भगुर परिसरात सभा होती. तेव्हा मी आनंदवली परिसरात राहत होतो. बाळासाहेब ठाकरें विषयी ऐकल होत. त्यांचे विचार अंगात स्फूर्ती निर्माण करतात. असं अनेक जण म्हणायचे म्हणून मी ठरवलं होत की आज बाळासाहेबांची सभा ऐकू सभा सुरू झाली आणि बाळासाहेब गरजले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो हे ऐकल्या नंतर मला उत्साह वाटला. एक ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटल त्यानंतर बाळासाहेबांनी अनेक विषयांवर परखड मत मांडलं आणि तेच मला भावल त्यांच्या विचारानी मी प्रेरित झालो आणि ठरवलं शिवसेनेसाठी आता काम करायचं, असं मिनानाथ जाधव सांगतात. त्यानंतर बघता बघता मी शिवसेनेत पूर्ण झोकून देऊन काम करू लागलो. त्यानंतर मी बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद घेतला. मी कधी मुंबईत गेलो तर आवर्जून  बाळासाहेबांना भेटायचो. ते ही मला चांगले ओळखायचे. माझ्या नावाने हाक मारायचे,मला खूप आनंद व्हायचा. बाळासाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी काहीना काही भेट घेऊन जायचो. ते मला प्रेमाने जवळ घ्यायचे कधी आलास म्हणून विचारपुस करायचे. मी नाशिकमध्ये शिवसेनेची शाखा ओपन करून शाखाप्रमुख म्हणून अनेक दिवस काम केले. बाळासाहेबांचं जेव्हा निधन झाल. तेव्हा ही मी मातोश्रीवर होतो .बाळासाहेब जरी स्वर्गवासी झाले असले तरी ते कायम आमच्या ह्रदयात आहेत. त्यांचे विचार प्रज्वलित आहेत. मात्र, तेव्हा बाळासाहेबांनी एक आवाज दिला तरी लाखो सैनिक रस्त्यावर उतरायचे. आंदोलन करायचे कारण त्यांचा शब्द आमच्यासाठी सर्वस्व होत. पण आता तशी परिस्थिती दिसत नाहीये त्याची खंत वाटते, असंही जाधव सांगतात.

कागदी लगद्यातून क्रांती करणारा कलाकार, Video पाहून बसणार नाही डोळ्यांना विश्वास!

संबंधित बातम्या

शिवसेना फुटल्यापासून मिनानाथ अस्वस्थ आहेत शिवसेनेत गट पडल्यापासून मन अस्वस्थ होऊन गेलय असं मिनानाथ सांगतात. कारण बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने शिवसेना उभी केली होती.अक्षरशः रक्ताच पाणी त्यांनी पक्ष उभा करण्यासाठी केलं होत आणि आज त्याच शिवसेनेचा तडा गेला आहे. मात्र एक शिवसैनिक म्हणुन माझ अजूनही प्रामानिक मत आहे आणि हात जोडून कळकळीची विनंती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत जे आमदार गेले आहेत. त्यांनी अजूनही मातोश्रीवर यावं. अजूनही वेळ गेलेली नाहीये,शिवसेनेची अशी अवस्था आम्हाला बघवत नाही,अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. आम्ही कायम एकनिष्ठच राहणार शिवसेना हा एक विचार आहे. त्यामुळे तो कधीच संपणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करतोय. मात्र आम्ही कोणत्याही लोभाला बळी पडलो नाही. नेहमीच पक्षासोबत राहिलो पदासाठी कधी हापापलो नाही. पक्ष जो आदेश देईल तसच काम केलं. अनेकांनी पक्षाच्या नावाखाली घर भरली पण आम्ही एकनिष्ठ,प्रामाणिक राहून काम केलं असं मिनानाथ जाधव यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या