JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : गणपती बाप्पा सांगतो मतदान करा... मोठ्या त्रुटीवरही ठेवलं बोट VIDEO

Nashik : गणपती बाप्पा सांगतो मतदान करा... मोठ्या त्रुटीवरही ठेवलं बोट VIDEO

Ganeshotsav 2022 : नाशिकमध्ये गणेशोत्सवासमोरील देखाव्याच्या माध्यमातून मतदानासंबंधी जागृती करण्यात आली असून एक महत्त्वाची सूचना देखील करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 7 सप्टेंबर : स्वातंत्र्यपूर्ण काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली गणेशोत्सवाची (Ganeshotsav) परंपरा राज्यातही आजही जपली जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणेच गणेशभक्त देखील आपल्या घरात वेगवेगळे देखावे तयार करतात. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाच्या दर्शनासाठी आपण एकमेकांच्या घरी जातो. त्यावेळी देखाव्याच्या माध्यमातून आपल्या मित्र परिवारामध्ये जागृती निर्माण व्हावी याचा प्रयत्न करणारी कुटुंब आहेत. नाशिकमधल्या बावरी कुटुंबाने देखील याच प्रकारचा एक समाजिक संदेश (Ganeshotsav in Nashik) देणारा देखावा सादर केला आहे. त्यांचा हा देखावा लक्षवेधी ठरतोय. काय आहे देखावा? भारतीय राज्यघटनेनं 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार वापरुन आपले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी संधी प्रत्येक प्रौढ नागरिकाला आहे. मतदान करणे हे प्रत्येक प्रौढ नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. पण, हे कर्तव्य बजावण्यास अनेक नागरिक टाळाटाळ करतात. मतदानाच्या दिवशी सुट्टी असेल तर त्याचा आनंद घ्या. आमंच एक मत नसेल तर काय फरक पडणार आहे? असा विचार ही मंडळी करतात. त्यामुळेच निवडणुकांमध्ये सर्वसाधारणपणे 50 ते 60 टक्के मतदान होते. मतदानाच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नाशिकच्या बावरी कुटुंबाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ हा देखावा साकारला आहे.‘आम्ही मतदान करून आमची जबाबदारी पार पाडू, तरच सरकार आमच्या भल्यासाठी काम करेल अशी अपेक्षा करू शकतो. आपण जबाबदारीपासून दूर गेलो नाही तरच  ‘सबका साथ आणि सबका विकास’  शक्य आहे  हे सांगण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. VIDEO : ‘कोरडे गणपती’ नाव कसे पडले माहिती आहे का? रंजक आहे इतिहास गणेशोत्सव दोन वर्षांपासून घरगुती प्रमाणात साजरा होत होता. आम्ही मागच्या तीन वर्षांपासून मागील तीन वर्षांपासून आवाज उचलणारे देखावे सादर करतो. यंदा जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ हा विषय निवडला. मतदार हा लोकशाहीचा स्तंभ असून त्यांच्यात जागृती झाली पाहिजे. ते मतदानासाठी बाहेर पडावेत.  निवडणुकांच्या काळात दाखवण्यात येणाऱ्या आमिशाला बळी न पडता त्यांनी योग्य उमेदवार निवडून द्यावा हे सांगण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आल्याचं करण बावरी यांनी सांगितलं. नाशिकमध्ये साकारला पुस्तकांचा बाप्पा, पाहा कशी सुचली अनोखी कल्पना VIDEO सुचवली महत्त्वाची सुधारणा 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे आणि मताधिकार बजावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बोगस मतदानासारखे गैरप्रकार टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार कार्डाला जोडण्यात यावे अशी महत्त्वाची सूचना देखील बावरी कुटुंबीयांनी या देखाव्याच्या माध्यमातून केली आहे. ही सूचना प्रत्यक्षात आली तर अनेक गैरप्रकार थांबू शकतील असा त्यांना विश्वास आहे. देखावा पाहण्याचा पत्ता : द्वारका सिग्नल जवळ,अधिक माहितीसाठी 919511944111 या फोन नंबरवर संपर्क करावा. देखावा बघण्याची वेळ सकाळी 9 ते रात्री 8

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या