JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक : मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुलांनी संपवलं जीवन

नाशिक : मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुलांनी संपवलं जीवन

नाशिक जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

जाहिरात

आत्महत्या केलेले तिन्ही जण.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 30 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एकाच परिवारातील तिघांनी वेगवेगळ्या खोलीत जाऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण - नाशिकच्या सातपूरमधील राधाकृष्ण नगर परिसरात काल एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक शिरोडे (वडील), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय 25 ), राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत. बाप आणि दोन मुलांनी एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत जाऊन आर्थिक तंगीमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे ही आत्महत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. शिरोडे कुटुंब मूळचे देवळा तालुक्यातील उमराने येथील आहे. गेल्या दहा वर्षापासून व्यवसायानिमित्ताने नाशिकला आले होते. दीपक शिरोडे यांचा अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्रीचा व्यवसाय आहे. तर त्यांचा मुलगा प्रसाद यांची पत्नी गर्भवती होती. त्यामुळे ती मुंबईला गेली होती. काल सकाळीच तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, दुर्दैवाने त्यानंतर दुपारी प्रसाद यानेही वडील आणि भावासोबत फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दीपक यांचा अशोक नगरच्या शेवटच्या बस स्टॉपवर फळ विक्रीचा धंदा होता. प्रसाद आणि राकेश हे दोघे शिवाजी नगरात गाडीवरून फळ विक्रीचा व्यवसाय करायचे. आर्थिक परिस्थिी बिघडल्याने हे कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली होते. त्यामुळे शिरोडे कुटुंबीय टेन्शनमध्ये होते. रविवारी दुपारी घरातील काही लोक बाहेर गेले होते. त्याचवेळी दोन्ही मुलांनी वडिलांसोबत आत्महत्या केली. हेही वाचा -  ड्रायव्हरला झोप लागली, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् घडलं भयानक, दोघांचा मृत्यू घरातील लोक आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला असता या तिघांचे मृतदेह पंख्याला लटकलेले दिसले. दरम्यान, याठिकाणी एक सुसाईड नोटही सापडली आहे. त्यात सावकाराचे नाव लिहिलेले आहे. सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितले जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या