कंटेनरला आग लागली
नाशिक, 11 डिसेंबर : नाशिक, मुंबई महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार पहायला मिळाला आहे. नाशिक, मुंबई महामार्गावर धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतला. या आगीत कंटेनरचं केबिन पूर्णपणे जळून खाक झालं आहे. केबिन जळाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवान या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बर्निंग कंटेनरचा थरार पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या बर्निंग कंटेनरचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक, मुंबई महामार्गावर पार्थर्डी फाटा परिसरात उड्डाण पुलावर धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतला. या घटनेत कंटेनरचं कॅबीन जळून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाहीये. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली यांच कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.