JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंधत्वावर मात करुन स्वाभिमानी आयुष्य जगणारे राजू, डोळसांनीही धडा घ्यावा असा पाहा Video

अंधत्वावर मात करुन स्वाभिमानी आयुष्य जगणारे राजू, डोळसांनीही धडा घ्यावा असा पाहा Video

राजू जन्मतः अंध आहेत त्यांना काहीही दिसत नाही. पण, त्यांच्या स्वावलंबी जगण्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 15 डिसेंबर : आपल्याला थोड अपंगत्व आल तरी आपण हताश निराश होऊन जातो आणि जणू आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरला नाही असं समजतो. मात्र, ज्याला जन्मतःच अपंगत्व आहे. त्यांनी काय करायचं? कोणाकडे बघायच? मात्र हल्ली तीच लोक आदर्श बनत आहेत. त्यापैकीच एक नाशिक शहरात राहणारे राजू सोनवणे हे आहेत. राजू जन्मतः अंध आहेत त्यांना काहीही दिसत नाही पूर्णपणे अंध आहेत. मात्र, ते कोणावर अवलंबून न राहता स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःकरतात. गेल्या 22 वर्षांपासून राजू नाशिक शहरात अगरबत्ती विकण्याचे काम करत आहेत. जन्मतः अंध मात्र जगण्याची उमेद राजू सोनवणे शहरातील पाथर्डी फाटा परिसरात राहतात. मूळचे मालेगावचे आहेत. परंतु 22 वर्षांपासून नाशिक शहरात राहून अगरबत्ती विकण्याचे काम करत आहेत. त्यांना काहीच दिसत नाही तरीही त्यांच्या अंगात जगण्याची उमेद आहे. त्यांनी अंध असल्यामुळे लग्न केलेलं नाही. त्यामुळे ते एकटेच आपल्या आई सोबत राहतात. सकाळी 5 वाजता उठून ते आपली आवर सावर करतात. सर्व आटोपल्यानंतर नाश्ता करून सकाळी 8 वाजता घराबाहेर पडतात आणि आपल्या अगरबत्ती व्यवसायाला सुरुवात करतात. अगरबत्ती घ्या,म्हणून आवाज ठोकतात. अनेक जण त्यांचं कुतुहल म्हणून त्यांच्याकडून अगरबत्ती खरेदी करतात. त्यांना महिन्याकाठी आपल्या कमाईतून पाच सहा हजार रुपये भेटतात.पण त्यावर ते खुश आहेत.

सर्वांचा विरोध होता पण… किडनी देऊन पतीला वाचवणाऱ्या पत्नीनं सांगितली इमोशनल स्टोरी, Video

संबंधित बातम्या

मला स्वाभिमानाने जगायचं आहे मला कोणाकडून भिक्षा मागून खाण्यास आवडत नाही. त्यामुळे मी माझे कष्ट करतोय. घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. आजही माझ्या जगण्याचा मला आनंद आहे. जे मिळतय ते आनंदात घ्यायच. जास्त पैशांची अपेक्षा करायची नाही. कोणाची फसवणूक करायची नाही, अशी प्रतिक्रिया राजू सोनवणे यांनी दिली आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम राजू सोनवणे यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा. ते मेहनत करतात. कोणाकडे ही हात पसरत नाहीत की मला काही द्या. ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. हल्ली किरकोळ संकट आले की हतबल होणारे आहेत. त्यांनी अशा लोकांकडे बघून आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया नागरिक अजिंक्य बोडके यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या